लोकलसमोर आत्महत्या करणाऱ्या वृद्धाला जवानांनी वाचविले.

    दिनांक :06-Jul-2019
 
 
मुंबई : मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर आत्महत्या करणाऱ्या एका वृद्धाला दोन जवानांनी वाचविल्याची घटना समोर आली आहे. या सर्व प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  लोक ट्रेनची वाट पाहताना एक आजोबा शांतपणे उतरले. समोरून लोकल येत होतीच त्याचवेळी ते ट्रॅकवर बसले. फलाटावर उभ्या असलेल्या लोकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर आरडाओरडा सुरू केला. तोपर्यंत लोकल जवळ येण्यास सुरूवात झाली होती. प्रसंगावधान राखून धाडस करीत MSF स्टाफ मनोज आणि अशोक यांनी रूळावर उडी मारत आजोबांना बाजूला केले. आजोबांना बाजूला करताच काही क्षणात ट्रेन त्या रूळावरून निघून गेली. हा सर्व प्रकार अत्यंत धक्कादायक होता. वेस्टर्न रेल्वेच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे.