विजेच्या धक्याने एकाच मृत्यू

    दिनांक :06-Jul-2019
मालेगाव: विजेच्या खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शकिल अहमद मुक्तार अहमद अन्सारी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 

 
शकिल अहमद मुक्तार अहमद अन्सारी हे चंदनपुरी गेट ते मरीमाता मंदिर रस्त्याने जात होते. त्यावेळी बोहरा समाज कब्रस्तानसमोर असलेल्या विद्युत खांबावरील विजवाहिनी तार तुटून पडली. तुटलेल्या तारेवर शकिल अहमद व मोहम्मद यासीन या दोघांचाही पाय पडल्याने त्यांना विजेचा धक्का बसला. यात मोहम्मद यासीन हा बाजूला फेकला गेल्याने बेशुद्ध पडला. तर शकील अहमद यांनी खांबाचा आश्रय घेतला. मात्र खांबातच विज प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागून ते जागीच ठार झाले.
नागरिकांनी दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र शकिल अहमद यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.