भुशी धरणावर पर्यटकांची वर्णी

    दिनांक :06-Jul-2019
लोणावळा : पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या भुशी धरणावर आज पर्यटकांचा जनसागर लोटला होता. सकाळपासूनच धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने धरणाच्या पायर्‍यांवर उभे राहण्यास देतील जागा शिल्लक राहिली नव्हती.

भुशी धरणाप्रमाणेच सहारा पूल धबधबा, खंडाळ्यातील राजमाची पॉइंट, पवना धरण, भाजे लेणी, कार्ला लेणी, लायन्स पॉइंट या सर्वच पर्यटनस्थळांवर आज दिवसभर पर्यटकांची तोबा गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. सकाळपासूनच भुशी धरण व लायन्स पॉइंट परिसरात जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढल्याने या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पावसाचा जोर देखील दिवसभर कायम असल्याने धरण व धबधब्याखाली भिजण्यासोबत रस्त्याने पायी चालणाऱ्या पर्यटकांनी वर्षाविहाराचा आनंद घेतला.