उंच लाटांमुळे मरिन ड्राईव्हवर दोन जण बुडाले

    दिनांक :06-Jul-2019
मुंबई: उंच लाटा उसळल्यामुळे मुंबईत मरिन ड्राईव्हवर दोन जण बुडाल्याचे घटना घडली आहे. लाटांचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या दोघांना लाटांनी समुद्रात ओढल्याचे सांगितले जात आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नेव्ही आणि अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे. समुद्रात उंट लाटा उसळल्यामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत. बचाव कार्यातील एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला असल्याचेही सांगण्यात येत आहे. दुपारी अडीचच्या सुमारास मोठी भरती होती. त्या वेळी एक जण लाटेबरोबर वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने धाव घेतली. दोघेही भरतीच्या लाटांमध्ये वाहून गेले बुडालेल्यांमध्ये एका आठ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. तो बुडत असताना त्याला वाचवायला गेलेला एक तरुण देखील बुडाल्याची माहिती मिळाली आहे. समुद्र खवल्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.