दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात

    दिनांक :06-Jul-2019
वर्धा: 1 जुलै  रोजी मनोज सोपान रायपुरे यांच्या मालकीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एम एच 32 एच 3612 ही बजाज चैकातुन अज्ञात इसमाने चोरुन नेल्याची तोंडी तक्रार वर्धा पोलीस स्टेशनला केली होती.  
या गुन्हयाचे समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असतांना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार  सदर मोटारसायकल चोर यवतमाळच्या दिशेने गाडी घेऊन गेल्याचे समजले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यवतमाळ जिल्हयातील आर्णी तालुक्यात जावुन अज्ञात इसमाचा शोध घेतला. शोध घेत असतांना वरील गुन्हयातील चोरीस गेलेली मोटारसायकल ही कारेगाव(आंजी) ता. आर्णीमध्ये असल्याची माहीती मिळताच कारेगाव(आंजी) येथे जावुन संशयीत इसम संजय हरीदास कासार याचे घराची झडती घेतली असता मोटारसायकल क्र एम एच 32 एच 3612 ही त्याचे घरी उभी असल्याचे दिसुन आले. सदर वाहनाबाबत विचारणा केली असता ती गाडी वर्धा येथुन बजाज चैकातुन चोरुन आणल्याची कबुली त्याने दिली.