गुणतक्त्यात भारत अव्वल स्थानी; सेमीफायनलचा सामना ठरला

    दिनांक :07-Jul-2019
मँचेस्टर,
विश्वचषकाच्या शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर १० धावांनी मात केली. त्यामुळे भारताने गुणतक्त्यामध्ये पहिले स्थान पटकाविले असून सेमीफायनलमध्ये भारत न्यूझीलंडसोबत भिडणार आहे.
 
 
 
दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर 325 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने शेवटच्या ओव्हरपर्यंत कडवी झुंझ देत 315 धावांवर ऑलआऊट झाली. दम्यान, भारताने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात सात गड्यांनी विजय मिळवत गुणतक्त्यामध्ये पहिला क्रमांक पटकावले. तसेच ऑस्ट्रेलियाचा दुसरा क्रमांक आहे.
 
यामुळे भारताचा सेमीफायनलमध्ये सामना 9 जुलैला निश्चित झाला असून चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडसोबत पुन्हा टक्कर होणार आहे. तर ऑस्ट्रेलियाची टक्कर यजमान इंग्लंड सोबत होणार आहे. हा सामना 11 जुलै रोजी खेळविला जाणार आहे.
यापूर्वी 13 जूनला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. यामुळे वर्ल्डकपमधील ही या दोन संघांमधील पहिलीच लढत असणार आहे.