ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस सरचिटणीस पदाचा राजीनामा

    दिनांक :07-Jul-2019
नवी दिल्ली, 
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सरचिणीस पदाचा राजीनामा दिला आहे. ट्विवटरवरून त्यांनी राजीनाम्याची माहिती दिली आहे.
 
 
ट्विटमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले आहे की, “लोकांचा निर्णय स्वीकारत आणि त्याची जबाबदारी घेत, मी राहुल गांधी यांना माझा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा सादर केला आहे. मला ही जबाबदारी आणि आमच्या पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
 
 
 
या अगोदर मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.