अबब! आढळला तब्बल १४ फुटाचा किंग कोब्रा

    दिनांक :07-Jul-2019
 
नवी दिल्‍ली,
सापाचे नाव काढले, तरी आपल्या मनात भीती निर्माण होते. अशा परस्‍थितीत १४ फूट किंग कोब्रा जर समोर आला तर काय होईल याची कल्पना करता येत नाही. आसमामधील नागाओंत भागात असाच किंग कोब्रा अचानक लोकांसमोर आला. हा काळ्‍या रंगाचा,१४ फुटाचा किंग कोब्रा तेथील चहाच्‍या मळ्‍यात सापडला.

 
 
मिळालेल्‍या माहितीनुसार ५ जुलै रोजी नागाओंतील जिआजुरी येथील चहाच्‍या मळ्‍यात सापडला. लोकांच्‍या नजरेस जेव्‍हा किंग कोब्रा पडला. तेव्‍हा त्‍यांनी याची माहिती वन विभागाला दिली. सर्वात पहिल्‍यांदा हा किंग कोब्रा या चहाच्‍या मळ्‍यात काम करणार्‍या कर्मचार्‍याच्‍या नजरेस पडला होता.
स्‍थानिकांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, विनोद दुलु बोहरा यांनी हा किंग कोब्रा पकडला व जंगलात सुखरुप सोडून दिला. बोहरांची ओळख पर्यावरण मित्र अशी आहे. त्‍यांनी ३००० पेक्षा जास्‍त प्राण्‍यांचा, पक्ष्‍यांचा, सापांचा जीव वाचवला आहे.