‘संघर्षनायिका’चे थाटात प्रकाशन

    दिनांक :07-Jul-2019
आणिबाणीतील संघर्षाचे पाथेय प्रेरणादायी
- खासदार कैलाश सोनी यांचे प्रतिपादन
नागपूर: आव्हाने अद्याप संपलेली नाहीत. आणिबाणी पर्वातील संघर्षाचे हे पाथेय नव्या पिढीला देऊन लोकशाही अक्षुण्ण ठेवण्यासाठीची चेतना नागपूरची भूमी देशाला पुरवेल, असे भावपूर्ण उद्गार लोकतंत्र सेनानी संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष खा. कैलाश सोनी यांनी व्यक्त केले.
आणिबाणी काळात मातृशक्तीने केलेल्या ऐतिहासिक शब्दरूपातील संचित म्हणजे ‘आणिबाणीतील संघर्षनायिका.’ याच पुस्तकाचे प्रकाशन श्री नरकेसरी प‘काशन लिमिटेडच्या पुढाकाराने रविवारी करण्यात आले. रेशीमबागेतील स्मृती भवन परिसरातील दत्तोपंत ठेंगडी सभागृहात झालेल्या या कार्यक‘माला लोकतंत्र सेनानी संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष खा. कैलाश सोनी, राष्ट्र सेविका समितीच्या पूर्व प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे, श्री नरकेसरी प‘काशन लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे, कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, प्रबंध संचालक धनंजय बापट, संचालिका मीरा कडबे आदी याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कांचन गडकरी तसेच ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्य यावेळी विशेषत्वाने उपस्थित होते.
आपल्या भाषणाच्या प्रारंभीच आणिबाणीतील संघर्षनायिकांना वंदन करून कैलाश सोनी यांनी राष्ट्रबीजांचे विचार प्रवाहित करणार्‍यात श्री नरकेसरी प‘काशन लिमिटेडचे मोठे योगदान असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले की, आणिबाणीकाळातील संघर्षाची गाथा निःपक्षपणे नरकेसरी प्रकाशनने प्राधान्याने प्रकाशित केली. मध्य प्रदेशात केवळ संघर्षनायकांचे अभिनंदन करण्यात आले. पण, श्री नरकेसरी प‘काशन लिमिटेडने यास अमरता प्रदान केली. इतिहासात नोंद केली. महाराष्ट्रात हा क्रम यापुढेही जारी राहील. या पुस्तकात सारा घटनाक‘म दिला आहे. अनुभवकथन आहे.
आणिबाणीकाळात घराघराची दशा झाली होती. आपले म्हणणार्‍यांनी वार्‍यावर सोडले होते. नमस्कार करणे सोडले, घरी येणे बंद केले. या काळातील सर्वात पुरुषार्थी भाग कुठला असेल तर तो होता आंदोलनाचा. आम्ही जबलपूर मध्यवर्ती कारागृहात होतो. 20 वर्षाची सजा झालेले आरामात शिक्षा भोगत होते. पण, आम्हाला मात्र कधी सुटू, याची शाश्वती नव्हती. आमचा अपराध काय होता? या परिस्थितीत 5-6 महिन्यानंतर, कल्पना करा की ज्यांनी आंदोलन केले, त्यांचे काय हाल झाले असतील. हा त्याग क्रांतीकारकांपेक्षाही काही कमी नव्हता. अशी कोणती प्रेरणा होती? यथार्थपणे संघर्ष भोगला आणिबाणीकाळात.
या काळातील संघर्षनायिकांना जो सन्मान महाराष्ट्रात मिळाला तेवढा सन्मान देशभरात कुठेही मिळाला नाही. यात अतिशयोक्ती नाही. जीजामाता, शिवबा, ज्योतिबांची ही भूमी. त्यागाची ही परंपरा कुठेच नाही. अद्भुत परंपरा आहे ही. संतांची एवढी मोठी परंपरा खचितच कुठल्या प्रांतात असेल. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास अशी कितीतरी नावे घेता येतील. स्वातंत्र्याचा संस्कार आमच्या डीएनएत कुठून झाला असेल तर तो आमच्या महाराष्ट्रातून. स्वातंत्र्य आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, असा नारा इतर कुठे नाही तर महाराष्ट्रातून आला. इतिहास चुकीचा लिहिला गेला की हा गुलामांचा देश आहे. पण हा खरा पुरुषार्थाचा देश आहे. सांस्कृतिक व सामाजिक जगात सर्वाधिक कुठे झाले असतील तर ते आमच्यावर (भारतावर). स्वातंत्र्य आमच्या रक्तात आहे, आमच्या आत्म्यात आहे.

 

स्वातंत्र्य संग्राम सेनानींना या देशात खुप सन्मान मिळाला. पण, देशात स्वातंत्र्य पुन्हा स्थापित झाले ते आणिबाणीनंतर. स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई होती. स्वतंत्र भारतात आणिबाणी हा काळा अध्याय लिहिला गेला. देशासाठी नाही, समाजासाठी नाही तर केवळ एका व्यक्तीची सत्ता कायम रहावी म्हणून आणिबाणी लादली गेली. पण, आव्हाने अद्याप संपलेली नाहीत. आणिबाणी पर्वातील संघर्षाचे हे पाथेय नव्या पिढीला देऊन लोकशाही अक्षुण्ण ठेवण्यासाठीची चेतना नागपूरची भूमी देशाला पुरवेल, अशी भावना कैलाश सोनी यांनी व्यक्त केली.
 
श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेडच्या संचालिका मीरा कडबे यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर याप्रसंगी विशेषत्वाने उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वागत कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, मा.गो. वैद्य यांचे स्वागत गजानन निमदेव, कैलाश सोनी यांचे स्वागत डॉ. विलास डांगरे तर प्रमिलाताई मेढे यांचे स्वागत अनिल दांडेकर यांनी केले. प्रमुख पाहुणे कैलाश सोनी यांच्या पत्नी मंजू सोनी याचे स्वागत मीरा कडबे यांनी केले. लोकतंत्र सेनानी संघाचे अध्यक्ष कैलाश सोनी यांचे स्वागत संघटनेचे विदर्भ प्रमुख बिंदूमाधव देव यांनी केले. गीता मुजुमदार यांनी आणिबाणीवरील कविता सादर केली. मीनाक्षी वैद्य यांनी प्रमिलाताई मेढे यांचा तर चारुदत्त कहू यांनी कैलाश सोनी यांचा परिचय करून दिला. श्याम पेठकर यांनी पुस्तकाविषयी विवेचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती किडे यांंनी केले. मीरा टोळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सार्‍या विदर्भातून अनेक संघर्षनायिकांनी उपस्थिती लावली. नागपूरकरांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सभागृहातील जागा कमी पडल्याने बाहेर खुर्च्या लावाव्या लागल्या.
इतर प्रांतांचीही दखल घ्यावी : प्रमिलाताई
 
भाषा, प्रांत आदी विविध कारणांनी देशाची एकात्मता नाहिशी करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून त्या विरोधात उभे ठाकून संघर्षनायिकेची भूमिका आपल्या सर्वांना बजावावी लागणार असल्याची जाणीव राष्ट्र सेविका समितीच्या पूर्व प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे यांनी करून दिली. आणिबाणीच्या काळात अनेक सामान्य भगिनींनी असामान्य धैर्य दाखवले. या भगिनींच्या कार्याची नोंद झालेली नव्हती. त्यांना लिहिते करण्याचे महत्कार्य तरुण भारतने केले, असा गौरवपूर्ण उल्लेख प्रमिलाताईंनी केला. हा एका प्रांतातील नायिकांचा संघर्ष आहे. पण, इतरही प्रांता-प्रांतात संघर्षनायिका असून त्यांचीही दखल तरुण भारताने घ्यावी, अशी सूचना त्यांनी संचालक मंडळाला केली.
 
आणिबाणीच्या काळात या भगिनींनी एक वेगळे कर्तव्य अतिशय धिरोदात्तपणे बजावले. आता वेगळ्या प्रकारची आणिबाणी आपल्या दारात येऊन ठेपलेली आहेत. ती म्हणजे कायदा आपल्या हातात घेण्याची आणि त्यासाठी सत्ता, संपत्ती व सौंदर्य याचा उपयोग केला जातोय्‌. दुसरे महत्त्वाचे आव्हान आहे की भारताची कीर्ती वाढावी, भारत सर्व जगाच्या समोर व्हावा हे अनेकांना फारसे रुचत नाही. भारताची एकात्मता नाहिशी कशी होईल, या दृष्टीने भाषा, जात, प‘ांत या वेगवेगळ्या कारणांनी ती भंग करण्याचे अनेक प्रकारचे प्रयत्न चालू आहेत. 1975 मध्ये आणिबाणी कायद्याने लादली गेली. नवी आणिबाणी कुणी लादलेली नाहीय्‌. आपल्या निष्काळजीपणाने आपल्यावर ती हावी होऊ पहात आहे. याच्याशी लढा करायला अशाच प्रकारच्या संघर्षनायिका ठिकठिकाणी पुन्हा उभ्या रहाव्यात, अशी अपेक्षा आहे.
 
असं म्हणतात की स्त्री ही राष्ट्राची आदिशक्ती आहे. त्यामुळे जिथे कुठे भ‘ष्टाचार असेल तेथे संघर्षनायिका उभ्या राहिल्या पाहिजेत. माझ्या घरातील माझा मुलगा, माझा नवरा अशा तर्‍हेच्या भ‘ष्टाचारात कामात कधीही सहभागी होणार नाही, ही काळजी त्यांना घ्यावी लागेल. एकात्मता कायम ठेवण्यासाठी सजग रहावे लागेल. या संघर्षनायिकेची भूमिका आपल्या सर्वांना बजावावयाची आहे, असेही त्या म्हणाल्या.