भंडारा पोलिसांची जुगार अड्यावर धाड

    दिनांक :07-Jul-2019
20 जुगा-यांना घेतले ताब्यात
 
भंडारा: भंडारा पोलिसांनी आज रविवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास एका इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड टाकून 20 जुगा-यांना ताब्यात घेतले.
शहरातील राजीव गांधी चौकातील एका इमारतीत मोठा जुगार अड्डा चालत असल्याची माहिती भंडारा पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास धाड टाकण्यात आली. यावेळी येथे मोठ्या प्रमाणात भरविला असल्याचे दिसून आले. घटनास्थळावरून 20 जुगा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सायंकाळपर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती. येथून क्रिकेट विश्वचषक स्पर्धेवर मोठ्या प्रमाणात जुगार लावण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.