वणी- अतिक्रमण धारकांना घरकुलाचा मार्ग मोकळा

    दिनांक :07-Jul-2019
नगराध्यक्ष बोर्डे यांनी दिला होता उपोषणाचा ईशारा
वणी: वणी नगर परिषदेचे अध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांनी पंतप्रधान आवास योजना अतर्गत न. प. क्षेञातील शासकिय जमीणीवरील अतिक्रमन धारकांना शासकीय पट्टयांना मंजुरी प्रदान करण्यासाठी आक्रमक भूमिका घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर व आमदार बोदकुरवार यांच्या पुढाकाराने उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी तात्काळ अतिक्रमण धारकांच्या जागेची मोजणी करून देण्याचे लेखी आश्वासन दिले त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
येथील उपविभागीय अधिकारी यांना दि. 28 जुनला निवेदन देऊन पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शासकीय जमिनीवरील अतिक्रमण धारकांना कायम पट्टे देऊन घरकुलासाठी निधी मंजूर झाला आहे. परंतु येथील भूमी अभिलेख कार्यालयातर्फे या अतिक्रमित शासकीय जमिनीची मोजणी करून अहवाल सादर न केल्यामुळे यानां कायम पट्टे मिळून घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले नाही त्यामुळे सात दिवसाचे आत भूमी अभिलेख विभागाने मोजणी करण्याची कार्यवाही न केल्यास दि. 15 जुलै पासून नगर सेवकासह साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. वणी न. प. क्षेञात 1265 घरांचे उद्दीष्ट असल्याने या शासकिय अतिक्रमण धारक लाभार्थ्यांना जमिनीचे कायम पट्टे देण्यात आले नसल्याने न. प. क्षेञातील पंतप्रधान आवास योजनेची कारवाई प्रलंबीत आहे.या मागणीबाबत जनमानसात प्रचंड आक्रोष होता. व योजणेच्या लाभाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अतिक्रमण धारक लाभार्थ्यांना साखळी उपोषणानंतर सुद्धा न. प. क्षेञातील शासकिय जमिणीवरील अतिक्रमन धारक लाभार्थ्यांना घरकुलाचे मोजणी करुन कायम पट्टे न दिल्यास नाईलाजास्तव 7 दिवसानंतर दि.21 जुलै पासुन लाभार्थ्यांना आंदोलनात समाविष्ट करुन आमरण उपोषनास करण्याचा इशारा दिला होताे.

 
 
माजी केंद्रिय ग्रुह राज्यमंञी हंसराज अहिर व आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी सदर प्रकरणाचे अनुषंगाने पुढाकार घेतल्याने दि. 7 जुलै पासुन उपअधिक्षक भुमिअभिलेख कार्यालयाने वणी शहरातील अतिक्रमन धारकांच्या जागेची मोजणी करून देण्याचे लेखी आश्वासन उपविभागीय अधिकारी यांचे समक्ष दिल्याने सदर आंदोलन स्थगीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलणाच्या यशाने वणी शहरातील सर्व शासकिय जमिणीवरील अतिक्रमन धारकांना शासकिय पट्यांना मंजुरी मिळणार असुन शासननिर्णयानुसार पाञ नागरीकांना त्यांच्या मालकी हक्काचे घराकरीता जागा मिळण्यास सोयीचे झाले आहे. आंदोलनाचे समापनाचे वेळी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, एसडीओ जावळे, संजय पवार उपअधिक्षक भुमिअभिलेख, उपमुख्यधिकारी क्रुष्णा देवरे, न. प. चे सदस्य प्रशांत निमकर, नितीन चहानकर, सुभाष वाघडकर व वणी शहरातील अतिक्रमनधारक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.