मुलींना जास्त स्वातंत्र्य मिळाल्याने अपहरणाच्या घटनेत वाढ!

    दिनांक :07-Jul-2019
नवी दिल्ली : देशात महिलांवरील अत्याचार आणि अपहरणाच्या वाढत्या घटना चिंता वाढविणाऱ्या आहेत. अश्यात मध्य प्रदेशात तर मुलींच्या अपहरणाच्या वाढत्या घटना मोट्या प्रमाणात समोर येत आहे. मात्र तेथील पोलिस महासंचालकांनी याबाबत अजब दावा करून नवा वाद ओढवून घेतला आहे. अपहरणाच्या घटनांना मुलींना दिले जाणारे अधिकचे स्वातंत्र्य आणि जास्तीची सूट कारणीभूत असल्याचे व्ही. के. सिंह यांचे म्हणणे आहे. मुली घर सोडून गेलेल्‍या असतात मात्र तक्रार अपहरणाची असते, अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे, असेही सिंह म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर समाजमाध्यमातून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

पोलिस महासंचालक व्‍हीके सिंह म्‍हणाले की, आता एक नवीन ट्रेंड आयपीसी 363 च्‍या रुपात पाहायला मिळत आहे. मुली आता काही जास्‍तच स्‍वतंत्र झाल्‍या आहेत. मुली आता शाळा, कॉलेजमध्‍ये जात आहेत. शाळा, कॉलेजमध्‍ये त्‍यांचा सामना मुलांच्‍यासोबत होतो. अशावेळी त्‍यांचे एकमेकांसोबत इंटरॅक्शन देखील होत असते, हे नाकारता येत नाही. हेच यापाठीमागचे खरे कारण आहे.
अशा घटनांमध्‍ये पाहायला मिळते की, मुली घर सोडून पळून गेलेल्‍या असतात, मात्र तक्रार अपहरणाची केली जाते. त्‍यांचा हा व्‍हिडिओ सोशल मीडिया व्‍हायरल होत आहे. त्‍यांच्‍या या व्‍हिडिओवर लोकांच्‍या तिखट प्रतिक्रिया येत आहेत.