OBC नेते मराठा आरक्षणााच्या विरोधात जाणार सर्वोच्च न्यायालयात!

    दिनांक :07-Jul-2019
मुंबई: मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी समाजाचे नेते आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. या संदर्भात आखणी करण्यासाठी आज ओबीसी आणि व्हीजेएनटी संघटनांची बैठक होणार आहे. 40 हजार नोकऱ्यांचा अनुशेष भरा आणि मगच मेगाभरती करा, अशी मागणी ओबीसी आणि व्हीजेएनटी संघटनांची आहे.

 
उच्च न्यायालयाने कायदेशीर तरतुदी लक्षात घेतल्या नसल्याच्या आरोप करत याचिकाकर्ते संजीत शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यानंतर आता OBC संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.
दरम्यान, अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिले जाऊ शकते, असे म्हणत उच्च न्यायालयाने शिक्षण आणि नोकरीत मराठा आरक्षण वैध ठरवले आहे.