दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया प्रभावित होणार नाही : लँगर

    दिनांक :08-Jul-2019
लंडन,
खेळाडूंच्या दुखापतीच्या समस्येमुळे उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियावर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी व्यक्त केला आहे. 

 
 
अव्वल फळीतील फलंदाज उस्मान ‘वाजा व शॉन मार्श दुखापतीमुळे विश्वचषकाच्या बाहेर झाले आहे. या दोघांच्या जागी मॅथ्यू वॅडे व पीटर हॅण्डस्‌कॉम्ब यांना पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, अष्टपैलू मार्कस स्टोइनिस यानेही आपल्या दुखापतीची तक्रार  केली होती, त्यालाही दोन सखळी सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. मिच मार्शला राखीव खेळाडू म्हणून बोलविण्यात आले आहे.
 
गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया आघाडीच्या स्थानावर होता, परंतु दक्षिण आफि‘केविरुद्धचा अखेरचा सामना गमावल्याने त्यांची दुसर्‍या स्थानी घसरण झाली. आता अकरा जुलै रोजी ऑस्ट्रेलियाचा उपांत्य सामना यजमान इंग्लंडशी होणार आहे.
 
आमच्याकडे अनेक पर्याय उपलब्द आहे आणि हीच आमच्यासाठी सकारात्मक बाब आहे. मग फलंदाजीच्या क‘मवारीत बदल केला, तरीही काहीही फरक पडणार नाही. इतका आमचा अनुकूलनीय संघ आहे, असे लँगर म्हणाले.