ब्राझीलला कोपा अमेरिका फुटबॉलचे जेतेपद

    दिनांक :08-Jul-2019
- पेरुवर 3-1 ने मात, अर्जेंटिनाला तिसरे स्थान

 
 
रिओ दी जानेरियो, 
गॅब्रियल जिझसला मैदानाबाहेर काढले तरीही दहा खेळाडूनिशी उत्स्फूर्त खेळाचे प्रदर्शन करत ब्राझीलने पेरूवर 3-1 असा विजय नोंदविला आणि कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
 
रिओ दी जानेरियोच्या मरकाना स्टेडियमवर एव्हर्टनने झतकास गोल नोंदवून ब्राझीलला खाते उघडून दिली, परंतु त्यानंतर पेनॉल्टी किकवर पेरूचा कर्णधार पाओलो गुएरोने गोल नोंदवून सामन्यात बरोबरीत मिळविली. त्यांतर गॅब्रियल जिझसने निर्णय गोल नोंदविला. या सामन्यादरम्यान गॅब्रियल जिझसला आददांड खेळबद्दल 20 मिनिटे मैदानाबाहेर काढण्यात आले होते. अखेरच्या क्षणाला बदली खेळाडू रिचार्लिसनने पेनॉल्टी कॉर्नरला गोलमध्ये परावर्तित करून ब्राझीलच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. 2007 सालानंतर प्रथमच ब्राझीलने विजेतेपद पटकावले.
 
अर्जेंटिनाला तिसरे स्थान, मेस्सीला लाल कार्ड
तिसर्‍या स्थानासाठी झालेल्या लढतीत मेस्सीच्या अर्जेंटिनाने चिली संघावर 2-1 असा विजय नोंदविला. मात्र या सामन्याअखेरीस लियोनेल मेस्सीला पंचांनी लाल कार्ड दाखवत मैदानाबाहेर काढले. त्यामुळे अर्जेंटिना संघाने पंचांच्या निषेधार्थ पदक वितरण सोहळ्यावर बहिष्कार घातला. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेदरम्यान आमचा अनादर झाला. भ‘ष्टाचार आणि पंचांमुळे फुटबॉलची नासाडी होत आहे, अशी सडकून टीका मेस्सीने यावेळी केली.