हिमा दासची पुन्हा एकदा ‘सुवर्ण धाव’!, चार दिवसांत दोन सुवर्णपदकांची कमाई

    दिनांक :08-Jul-2019
भारताची अव्वल धावपटू हिमा दास हिने नवा इतिहास रचला आहे. हिमा दिस हिने चार दिवसांत भारताला दुसरे सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. ५ जुलै रोजी हिमा दासने २०० मीटरमध्ये सुवर्णपद जिंकले होते. आता पुन्हा एकदा हिमाने सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे. पोलंड येथे सुरू असलेल्या स्पर्धेत हिमा दिसने ही सुवर्ण कामगिरी केली आहे. 

 
कुट्नो एथलेटिक्स मीट प्रकारात हिमाने सुवर्ण पदक पटकावले आहे. हिमा दासने 23.77 सेंकदामध्ये २०० मीटर अंतर पार करत विजयी कामगिरी केली आहे. वीके विस्मयाने 24.06 सेकंदात २०० मीटर अंतर पार करत दुसरे स्थान पटकावले आहे. पुरूषामध्ये मोहम्मद अनसनेही 21.18 सेकंदामध्ये २०० मीटर अंतर पार करत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे.
४०० मीटर स्पर्धेतील वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पिअन आणि नॅशनल रेकॉर्ड आपल्या नावे असणारी हिमा दास गेल्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त होती. मात्र स्पर्धेत तिने पुनरागन करत चार दिवसांत भारताला दोन सुवर्णपदकं मिळवून दिली आहेत.
हिमा दासने केलेल्या सुवर्ण कामगिरीनंतर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून तिचे अभिनंदन केले आहे.