मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर दरड कोसळली; वाहतुकीचा खोळंबा

    दिनांक :08-Jul-2019
मुंबई: पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. मंकीहिल ते कर्जत दरम्यान लोहमार्गावर दरड कोसळण्याची ही १५ दिवसातील चौथी घटना आहे. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. पावसामुळे खंडाळा (बोरघाट) घाटात मंकीहिल जवळ मिडल आणि डाऊन लोहमार्गावर दरड कोसळली तर खंडाळ्यातील महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोर रेल्वे साठे मिसळ मागे लोहमार्गावर मार्गालगतची संरक्षक भिंत कोसळली होती. या घटनांमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून, रेल्वेच्या वतीने मार्गावरील दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.