उत्तरप्रदेशात बस नाल्यात कोसळून 29 प्रवाशांचा मृत्यू

    दिनांक :08-Jul-2019
- अपघाताच्या चौकशीसाठी समिती
- कुटुंबीयांना पाच लाखांची नुकसानभरपाई
लखनौ,
उत्तरप्रदेशातील यमुना एक्स्प्रेसवेवर आज सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात झाला. यमुना एक्स्प्रेसवेवर उत्तरप्रदेश परिवहन महामंडळाची बस झरना येथील नाल्यात कोसळली. यामध्ये आतापर्यंत 29 जणांना मृत्यू झाला आहे. या अपघातात 18 प्रवासी जखमी झाले आहेत. ही अवध आगाराची ‘जनरथ’ बस होती.
 
 
 
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताबळींबाबत शोक व्यक्त
केला आहे. या अपघाताच्या चौकशीसाठी समिती नेमण्याचे आदेश त्यांनी दिले असून, 24 तासांत या समितीला अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची नुकसानभरपाईची घोषणा करण्यात आली आहे.
मृतांमध्ये दीड वर्षांची मुलगी, एक युवती आणि 27 पुरुषांचा समावेश आहे. जखमींना उपचारांसाठी ज़वळच्या रुग्णालयात दाखल केल्याची माहिती जिल्हाधिकारी एन. जी. रवि यांनी दिली. ही बस लखनौहून दिल्लीच्या दिशेने आनंद विहार इथे जात होती. बस ज्या नाल्यात कोसळली तो 20 फूट खोल आहे. अपघातानंतर मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
 
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, चालकाला डुलकी लागल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला, असे म्हटले जात आहे. संरक्षण मंत्री राजनाथिंसह यांनीही या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. भाजपाचे राज्य सरचिटणीस पंकजिंसह यांना त्यांनी दुर्घटनास्थळी भेट देण्यास पाठविले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि परिवहन मंत्री स्वतंत्रदेव िंसह यांनाही घटनास्थळी जाऊन देखरेखीचे आदेश दिले आहेत. राज्यसभेतही कामकाजाच्या आरंभी अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.