'मॅच फिक्स असेल तर तयारी करण्याला काय अर्थ - राज ठाकरे

    दिनांक :08-Jul-2019
नवी दिल्ली: ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता असल्यानं आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्या, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केली. त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाची भेटदेखील घेतली. 'ईव्हीएमध्ये मोठा घोळ झाला आहे, जे जिंकले आहेत त्यांना जिंकून कसे आलो याबाबत शंका आहे. मतदाराना त्यांनी कुणाला मतदान केले ते समजले पाहिजे. मी त्याच संदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. निवडणूक आयोगाकडून मला शून्य अपेक्षा आहे. कारण त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव होते त्यावरूनच हे लक्षात येत होते की त्यांना आमच्या बोलण्यात काहीही स्वारस्य नाही' असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. ईव्हीएमची चीप अमेरिकेतून येत असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. त्यामुळे ईव्हीएम हॅक करण्यात परकीय शक्तीचा हात असू शकतो, अश्यात मॅच फिक्स असेल तर तयारी करण्याला काय अर्थ असेही ते म्हणाले. दरम्यान निवडणुकीत ईव्हीएम बद्दल त्यांची नेमकी भूमिका काय असेल या बद्दल ते मुंबईत गेल्यावर सांगणार आहेत.