केजरीवाल, सिसोदियांना न्यायालयाचा समन्स

    दिनांक :08-Jul-2019
नवी दिल्ली, 
भाजपा नेते विजेंदर गुप्ता यांनी दाखल केलेल्या मानहानी तक्रारीची दखल घेऊन अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आज सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना समन्स जारी केला आहे. 

 
 
विजेंदर गुप्ता हे माझ्या हत्येचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप केजरीवाल आणि सिसोदिया यांनी केला होता. या प्रकरणी गुप्ता यांनी मानहानीचा दावा दाखल करणारी तक्रार दिली होती.
 
हे आरोप गुप्ता यांची समाजात बदनामी करणारे असल्याचेच प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे स्पष्ट करीत, न्या. समर विशाल यांनी केजरीवाल आणि सिसोदिया दोघांनाही समन्स बजावला आहे.