सुरेखा पुणेकर बिग बॉसच्या घरातून बाहेर

    दिनांक :08-Jul-2019
मुंबई,
महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या.वीक एंडचा डावमध्ये महेश मांजरेकर यांनी सुरेखा पुणेकर एलिमिनेट झाल्याचे जाहीर केले.
 
 
'मी सहा आठवडे या घरात राहिले याचा मला अभिमान आहे. घरातील सगळ्यांनी मला जो मान दिला त्यासाठी मी आनंदी आहे' असं त्या म्हणाल्या.
या आठवड्यात वैशाली, रुपाली, हीना, किशोरी आणि सुरेखा पुणेकर नॉमिनेशन प्रक्रियेत सहभागी होत्या. त्यापैकी वैशाली आणि सुरेखा पुणेकर डेंजर झोनमध्ये आल्या आणि आजच्या भागात सुरेखा पुणेकर बाहेर पडल्या.