व्हिडिओ पाहून बिग बी झाले भावुक

    दिनांक :09-Jul-2019
मुंबई,
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. फेसबुक किंवा ट्विटर अकाउंटवरून ते सतत काहीतरी पोस्ट करत असतात.
 
 
अमिताभ यांनी नुकताच त्यांच्या चाहत्यानं शेअर केलेला व्हिडिओ रिशेअर केला. हा व्हिडिओ पाहून बिग बी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
 
 
२००४च्या फिल्‍मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिनेता अभिषेक बच्चनला युवा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. अभिषेकचा पुरस्कार स्विकारतानाचा हा व्हिडिओ पाहून 'पुन्हा एकदा डोळे भरून आले, या भावना शेअर करण्यासाठी धन्यवाद!' असं अमिताभ यांनी म्हटलंय.