नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला तरूण बनला माओवादी कमांडर

    दिनांक :09-Jul-2019
पुणे,
 पुण्यातील भवानी पेठ भागात कधी काळी वास्तव्यास असणारा व नंतर अचानक बेपत्ता झालेला एक तरुण माओवादी कमांडर झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. छत्तीसगढ येथील माओवादी संघटनेत तो सहभागी झाल्याचे  धक्कादायक वास्तव समोर आले आहे. छत्तीसगढ पोलिसांनी माओवाद्यांची एक यादी तयार केली आहे. संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा असे याचे नाव आहे. रांजनांदगाव या ठिकाणच्या तांडा एरिया कमिटीचा तो डेप्युटी कमांडर आहे असेही पोलिसांनी दिलेल्या यादीत स्पष्ट करण्यात आले आहे.

 
शेलार चे नाव विश्वा असेही आहे. नोव्हेंबर २०१० मध्ये तो बेपत्ता झाला. बरीच शोधाशोध केल्यानंतर तो बेपत्ता झाल्याची तक्रार जानेवारी २०११ मध्ये नोंदवण्यात आली. मात्र पुण्यातून बेपत्ता झालेला हा तरूण आता माओवादी कमांडर झाल्याची माहिती पुढे आली आहे.