'मिशन मंगल'चा टीझर प्रदर्शित

    दिनांक :09-Jul-2019
मुंबई,
अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षीत 'मिशन मंगल' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) वर आधारित असून अक्षय कुमारने यात एका वरिष्ठ वैज्ञानिकाची भूमिका साकारली आहे.
 
 
'मिशन मंगल'च्या टीझरमध्ये अक्षय कुमार सोबत सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, तापसी पन्नू, नित्या मेनन, कीर्ती कुल्हाडी आणि शर्मन जोशी मुख्य भूमिकेत दिसत आहेत. एक देश, एक स्वप्न, एक इतिहास. भारताचे अंतराळमधील खरे स्वप्न, असं म्हणत अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर हँडलवरून चाहत्यांसाठी हा टीझर शेअर केला आहे. हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०१३ मधील इस्रोकडून लाँच करण्यात आलेल्या मंगळयानावर आधारित आहे. रशिया, अमेरिका आणि युरोपियन देशानंतर मंगळावर पोहोचणारा भारत चौथा देश बनला आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारच्या 'मंगल मिशन'ची टक्कर प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या 'साहो' या चित्रपटाशी होईल.