जसा रस्ता तसा वळनरस्ता नियमाला हरताळ

    दिनांक :09-Jul-2019
वर्धा,
जिल्ह्यात रस्त्याची काम जोरदार सुरू आहेत. गावागावातील रस्त्यांसोबतच राष्ट्रीय महामार्गचे जाळे विणल्या जात आहेत. बुटीबोरी ते तुळजापूर या 365 किमीच्या राष्ट्रीय रस्त्याच्या बांधकामामुळे रस्ता कसा तयार होते हे वर्धेकरांना चांगले माहिती झाले आहे. दरम्यान, वर्धा आर्वी या राष्ट्रीय रस्त्याचेही चोपदरी करणं सुरू असून हे काम करार व नियमानुसार होत नसल्याचे या रस्त्यातून गेल्यावर स्पष्ट होते.
 


 
वर्धा आर्वी या ५३.७८ किमीच्या रस्त्याचे सिमेंटकरण,
सौंदर्यकरणं करण्याचा २१६ कोटींचा ठेका आंध्र प्रदेशातील आरपीपी कम्पनिकडे देन्यात आला आहे. ५४ किमीचा रस्त्याच्या बांधकामाला १८ महिन्याच्या करारावर ऑक्टोबर १८ मध्ये सुरुवात करण्यात आली. हे काम एप्रिल २०२० मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कामाची गती आणि आजी (मोठी) ते खरंगणा या मार्गावर रोज प्रवास करणाऱ्यांना या पेक्षा जुनाच रस्त बरा होता असे म्हणण्याची वेळ आली असून नव्याने जाणारा कार चालक पुन्हा आपले वाहन या रस्त्यावरून नेण्याची हिम्मत करणार नाही. वर्धेतून आर्वीला किंवा आर्वीहून वर्धेला नियमित येणाऱ्यांनानी रसुलाबाद वा पुलगाव या लांबच्या रस्त्याने येणे सुरू केले असून खरंगणा येथून येणारे जाणाऱ्यांना मात्र हा मार्ग आता नरकयातना वाटू लागला आहे.
वर्धेतून जाणाऱ्या बुटीबोरी ते तुळजापूर या मार्गाचे बांधकाम करताना वळणमार्ग अतिशय चांगला तयार करण्यात आल्याने या मार्गावर प्रवास करताना जराही त्रास झाला नाही. बुटीबोरी ते तुळजापूर हा जसा राष्ट्रीय मार्ग आहे तसाच हैद्राबाद ते मध्यप्रदेशकडे जाणारा हिंगणघाट ते आर्वी हा जवळपास १०० किलोमीटर चा मार्गही राष्ट्रीयच आहे परंतु या दोन्ही रस्त्याच्या बांधकामात जमीन आसमानचा फरक आहे. वर्धेतून आर्वीकडे जाण्याऱ्या या रस्त्याचे नक्की नियोजन काय असा प्रश्न या मार्गाहुन प्रवास करताना उपस्थित होतो. वर्धा आर्वी या ५३.७८ किमीच्या रस्त्यावर कुठेही शासनाच्या नियमानुसार वळण मार्ग तयार करण्यात आलेला नाही. रविवारी सकाळी ९ वाजता एका दुचाकी स्वराने खरंगणा ते आजी या मार्गावर वळण मार्गापेक्षा नव्याने बांधण्यात येणाऱ्या रस्त्यावरील गिट्टीतुन आपली दुचाकी टाकणे पसंत केले होते. विशेष म्हणजे या गिट्टीवर रॉलरही फिरवण्यात न आल्याने ते दुचाकी त्या गिट्टीत अक्षरशः फसत होती तर दुसरीकडे वळणा मार्ग त्याही पेक्षा खराब असल्याने जावे तरी कुठून असा प्रश्न अनेकांना दिवसभऱ्यात पडल्यास नवल वाटू नये.
या संदर्भात वर्धेतील राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता दुर्गे यांच्यासोबत सम्पर्क केला असता सर्व काम नियमित सुरू असल्याचे सांगून त्यांनी ठेकेदारांची पाठराखण केली. पर्यायी वळण मार्ग कसा असावा असा प्रश्न त्यांना विचारला असता मुरून, ह्याश टाकून त्यावर रोलर चालउन तो वाहन चालवण्यास योग्य असेल असा तयार करण्यात यावा असे त्यांनी सांगितले. परंतु, जसा रस्ता तसा वळनमार्ग हा शासकीय नियम असताना ठेकेदार नियमाने काम करीत नाही आणि अधिकारी साईडवर काय परिस्थिती आहे हे पाहत नसल्याने त्याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करवा लागत आहे.