रवी शास्त्रींची रोहित शर्मावर स्तुती सुमने !

    दिनांक :09-Jul-2019
वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत पाच शतकं ठोकणारा टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मावर सध्या सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. रोहित हा एकदिवसीय क्रिकेटमधील महान खेळाडू आहे, असे ते म्हणाले.

 
 
वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. एकूण आठपैकी सात सामने जिंकले आहेत. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पराभूत झाली आहे. त्यावरही शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या सामन्यात संघाची कामगिरी चांगली झाली होती, मात्र, नशीब त्यांच्यासोबत होते. मला वाटतंय की त्या दिवशी देव इंग्लंड संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये बसला होता. पुढच्या वेळी इंग्लंडविरुद्ध लढत झाली तर देवाने आमच्या ड्रेसिंग रुममध्ये बसावं. चिंतेचे  कोणतंही कारण नाही, असेही शास्त्री म्हणाले.