हृतिक- दीपिका बनणार राम सीता?

    दिनांक :01-Aug-2019
मुंबईः
छोट्या पडद्यावर 'रामायणा'वर आधारित अनेक मालिका प्रसारित झाल्या. प्रेक्षकांनीही या मालिकांना भरभरून प्रतिसाद दिला. आता चित्रपट निर्मात्यांनाही पौराणिक कथांची भूरळ पडली आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी आणि रवि उडयावर यांनी 'रामायणा'वर आधारित सिनेमाची घोषणा केली आहे. इतकंच नव्हे तर हा बिग बजेट चित्रपट ३डी स्वरुपात असणार आहे. फिल्मफेअरनं दिलेल्या वृत्तानुसार निर्मात्यांनी भगवान रामाच्या भूमिकेसाठी हृतिक रोशनसोबत संपर्क साधला असून त्यानंही या बिग बजेट चित्रपटासाठी होकार दिला आहे.

चित्रपटाचे निर्माते मधु मंटेना यांनी देवी सीतेच्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोणला निश्चित केलं आहे. अद्याप याबाबत निर्णय घेण्यात आला नसला तरी लवकरच चित्रपटाबाबत घोषणा करण्यात येणार आहे.
'मी 'रामायण'साठी काम करण्यास खुप उत्सुक आहे. माझ्या 'छिछोरे' चित्रपटाचं काम पूर्ण होताच मी रामायणावर काम सुरू करणार आहे. हा चित्रपट माझ्यासाठी आव्हानात्मक आहे.' असं नितेश तिवारी म्हणाले. चित्रपटाचं बजेट ५०० कोटींचं बजेट असून हिंदी, तेलुगू, आणि तामिळ भाषांमध्ये बनवण्यात येणार आहे.