अक्षय घेतो ५४ कोटी मानधन

    दिनांक :01-Aug-2019
मुंबई,
बॉलिवूडमधील टॉप १०च्या यादीत खिलाडी कुमार अक्षयचं नाव घेतलं जातं. बॅक टू बॅक सुपरहिट चित्रपट देणारा अक्षय कुमार सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या हिरोंच्या यादीत पोहचला आहे. एका वर्षात एकहून अधिक सुपरहिट चित्रपटांमुळं अक्षयनं त्याच्या मानधनात वाढ केल्याची चर्चा आहे. एका चित्रपटासाठी अक्षय ५४ कोटी घेत असल्याचं बोललं जातं आहे.
 

 
 
एका इंग्रंजी वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमार एका चित्रपटासाठी ५४ कोटी रुपये घेतो. अक्षयसाठी ९ आकडा लकी असल्याचं तो मानतो. म्हणूनचं रावडी राठोडसाठी त्यानं निर्मात्यांकडे २७ कोटी मानधन मागितलं होतं. आता अक्षय कुमारनं त्याच्या मानधनात वाढ केली आहे. निर्मातेही अक्षयला तेवढं मानधन देण्यास तयार आहेत.
काही दिवसांपूर्वी फोर्ब्सनं सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकरांची यादी जाहीर केली होती. या यादीत अक्षय कुमार या एकमेव भारतीय कलाकाराचा समावेश होता. एका वर्षात अक्षयनं ४४४ कोटींची कमाई केली होती.