दिया मिर्झानं घेतला घटस्फोटाचा निर्णय

    दिनांक :01-Aug-2019
मुंबई,
अभिनेत्री दिया मिर्झा आणि पती साहिल संघा यांनी पाच वर्षांच्या संसारानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दियानं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहित याबाबत खुलासा केला आहे. दोघांच्या संमतीनं आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं तिनं म्हटलं आहे.


 
'११ वर्ष एकमेकांसोबत घालवल्यानंतर आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतला आहे. आम्ही जरी वेगळे होत असलो तरी आमच्यात मैत्रीचं नातं असेल. आमच्या या निर्णयाचा सगळ्यांनी आदर करावा.' असं दिया म्हणली.
ऑक्टोबर २०१४मध्ये दियानं साहिल संघासोबत लग्नगाठ बांधली. दिया आणि साहिल यांनी मिळून एक निर्मिती संस्था सुरू केली होती. या व्यवसायात ते दोघं भागीदार होते. त्यांनी सहा वर्ष डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याचं हे अकरा वर्षांचं नातं आता संपुष्टात येणार आहे.