ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री विद्या सिन्हांची प्रकृती चिंताजनक

    दिनांक :10-Aug-2019
मुंबई,
९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री विद्या सिन्हा यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विद्या यांना हृदय आणि फुफुस्साचा त्रास झाल्यानं त्यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
 
विद्या यांचं वय ७२ असून त्यांना काही वर्षांपासून फुफुस्सं आणि हृदयासंबंधित आजारांने ग्रासलं होतं. विद्या यांचं हृदय कमकुवत झाल्यानं डॉक्टरांनी यांची अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिलाय. मात्र, त्यांच्या नातेवाईंकानी अँजिओप्लास्टी करण्यास नकार दिला आहे.
विद्या यांनी त्यांचे पती नेताजी भीमराव साळुंखे यांच्यावर मानसिक व शाररिक छळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानं त्या अचानक चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर काहीच महिन्यांत त्यांनी घटस्फोट केला. विद्या यांचं हे दुसरं लग्न असून त्यांचे पहिलं लग्न वेंकटेश्वर अय्यर यांच्यासोबत झालं होतं. 'छोटी सी बात', 'रजनीगंधा', 'पती, पत्नी और वो' या सुपरहिट चित्रपटात त्यांनी काम केलंय. काव्यांजली, कुल्फी कुमार बाजेवाला या टी.व्ही मालिकांमध्येही त्या झळकल्या आहेत.