शिवशाही बस उलटली, १ ठार

    दिनांक :10-Aug-2019
चिखली-
नागपुरहून औरंगाबादकडे जाणार्‍या राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला पेठनजीक अपघात झाल्याने एक प्रवाशी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी 5.30 च्या सुमारास घडली.

 
प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रीय परिवहन महामंडळाची शिवशाही बस क्रमांक एम.एच.२९ बीई १३९४ ही बस नागपुरहून औरंगाबादकडे जात असतांना पेठजवळील नदीसमोर असलेल्या वळणावर समोरून येणार्‍या वाहनाला साईड देतांना बस रस्त्याचे कडेला उलटली. आज ता.10 रोजी सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला असुन बसमध्ये 7 प्रवासी होते. यातील नागपूरचे प्रवासी रमेश पांडुरंग सालोडकर हे जागीच ठार झाले. तसेच वाहक जखमी झाले. अमडापुर पोलीस स्टेशन या संदर्भात कैलास मनोहर घुले रा. औरंगाबाद यांनी फिर्याद दिली असून बस चालका विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास अमडापूरचे थानेडत सपोनि अमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे का राजेश गवई, पो का राहुल इंगळे हे करीत आहे.