टांझानियात तेल टँकरचा स्फोट; 57 जणांचा मृत्यू

    दिनांक :11-Aug-2019
मोरोगोरो,
देशाच्या पश्चिम भागातील दर एस सालेम या आर्थिक राजधानीमध्ये तेलाचा टँकर उलटून झालेल्या भीषण स्फोटामध्ये 57 जणांचा मृत्यू झाला. 

 
 
महामार्गावरून जाणारा टँकर उलटल्यानंतर त्यातील तेल सांडायला लागले. हे पाहताच स्थानिक गावकर्‍यांनी तसेच बोडा-बोडा नावाने ओळखल्या जाणार्‍या टॅक्सीचालकांनी तेल गोळा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी अचानक टँकरचा स्फोट झाल्याने 57 जण त्यात ठार झाले. दरम्यान, लोकांच्या गर्दीतूनच कुणीतरी सिगारेट ओढळल्याने हा स्फोट झाला असावा. मृतांची सं‘या अधिक असण्याची शक्यता आहे, असे स्थानिक पोलिस प्रमुख विलब‘ोड मताफुंग्वा यांनी पत्रकारांना सांगितले.
 
हा स्फोट इतका भीषण होता की रस्त्यावरून जाणार्‍या टॅक्सी आणि दुचाकीही खाक झाल्या. आजूबाजूच्या झाडांनीही पेट घेतला आणि मोठी आग पसरली होती. शहराच्या आजूबाजूला अद्याप अशाप्रकारची दुर्घटना कधी घडलेली नव्हती, असे मोरोगोरोचे गव्हर्नर स्टीफन केब्वी यांनी सांगितले. मागील महिन्यात पेट्रोलचा टँकर उलटल्याने झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान 45 जणांचा मृत्यू आणि 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. त्यापूर्वी मे महिन्यात निगेर शहराजवळही अशाच अपघातामध्ये 80 जणांचा मृत्यू झाला होता.