'या' अभिनेत्रींचे सर्वाधिक फेक फॉलोअर्स

    दिनांक :11-Aug-2019
मुंबई,
प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या दोन्ही अभिनेत्री बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वात चर्चित अभिनेत्रीपैकी आहेत. दोघांचे जगभरात खूप सारे चाहते आहे. या दोघीही सोशल मीडियावर जीवनातील अनेक सुखद-दु:खद प्रसंग चाहत्यांना शेअर करत असतात. अलीकडेच इन्स्टिट्यूट ऑफ कन्टेम्पररी म्युझिक परफॉर्मन्स संस्थेच्या संशोधनानुसार, सर्वाधिक 'फेक फॉलोअर्स' असणाऱ्या यादींमध्ये या अभिनेत्रींचा सामावेश आहे.

 
 
प्रियांका दहाव्या स्थानावर असून, तिचे ४३ टक्के इन्स्टाग्राम फॉलोअर्स हे बनावट आहेत. तर सहाव्या स्थानावर दीपिका पादुकोण असून, तिचे ४५ टक्के फॉलोअर्स हे बनावट आहेत. प्रियांकाचे एकूण ४३.६ कोटी आणि दीपिकाचे ३७.९ कोटी फॉलोअर्स इन्स्टाग्रामवर आहेत.
 
आम्ही सर्वात यशस्वी आणि सर्वाधिक फॉलोअर्स असाणाऱ्या सेलीब्रिटींची यादी तयार केली. या यादीमध्ये अभिनय, क्रीडा, संगीत आणि टिव्ही कलाकर अशा क्षेत्रातील सारी मंडळी आहे. या सर्वामधून सर्वाधिक १०० लोक निवडून त्यांची वेगळी यादी केल्याचे आयसीएपी या संस्थेने सांगितले. तसेच, आम्ही सेलिब्रिंटीच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर हँडलला आयजी ऑडिट आणि स्पार्कटोरोच्या फेक ट्विटर फॉलोअर्स टूलच्या माध्यमातून सेलीब्रिटींचे किती टक्के फॉलोअर्स खरे आहेत, याची माहिती मिळवल्याचे आयसीएमपी संस्थेने सांगितले.