अकोल्यात स्टेरॉयड इंजेक्शनचा मोठा साठा जप्त

    दिनांक :11-Aug-2019
विशेष पथकाची कारवाई
अकोला,
अकोल्यातील खोलेश्वर व नेकलेस रोड रतनलाल प्लॉट परिसरात आज अकोला पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई करत अवैधरित्या विक्री सुरु असलेला स्टेरॉयड इंजेक्शनचा मोठा साठा जप्त केला.
खेळांडूचा शाररिक क्षमता वाढण्यासाठी या स्टेरॉयड इंजेक्शनचा वापर केला जात होता. या प्रकरणी सचिन ओमप्रकाश शर्मा, विनायक मनोज मुळे, स्वप्निल कैलास गाडेकर या तिघांना घटनास्थळवरुन रंगेहात अटक करण्यात आली. एकूण 1 लाख  63 हजारांचा मुद्दे माल जप्त करण्यात आलाआहे.

 
स्टेरॉयड इंजेक्शनमुळे मुरूम येणे, झोप न येणे, उलटी, डायरिया, रक्तामधील कॅलशियम वाढणे, महिलांमध्ये पौरुषत्व गुण वाढणे, डोकं दुखी होणे,हार्मोनल असंतुलन होणे,पौरुषत्व शक्तीचा नाश होणे यासह आदिं प्रकारचे दुष्परिणाम होतात.
या प्रकरणी औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम अन्वयेनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल गांवकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकार आणि अन्न व औषधी विभागाचे निरीक्षक हेमंत मेतकर यांनी संयुक्तरित्या केली.