पर्यावरण संवर्धनासाठी दिवसाआड शौचाला जा!; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचा सल्ला

    दिनांक :13-Aug-2019
 
ब्राझिलिया, 
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सनारो यांनी देशवासीयांना पर्यावरण संरक्षणासाठी दिवसाआड शौचाला जाण्याचा सल्ला दिला आहे. माध्यमांशी चर्चा करताना जायर बोल्सनारो यांनी हा सल्ला दिला. थोडे कमी खाल्ल्याने काही फरक पडत नाही. प्रदूषणाचा पर्यावरणावर होणार्‍या परिणामांची तुम्ही चर्चा करता. तुम्हाला पर्यावरणाची काळजी असेल, तर दिवसाआड शौचाला जा. त्याने संपूर्ण जगाचा फायदा होईल, असे जायर म्हणाले. 
 
 
मात्र, रोज शौचाला जाण्याचा आणि पर्यावरण संवर्धनाचा थेट संबंध कसा आहे, याबद्दल जायर यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या सल्ल्याची संपूर्ण ब‘ाझीलमध्ये चर्चा होत आहे.