महत्त्व श्रीखंड महादेव यात्रेचं

    दिनांक :13-Aug-2019
हिंदू धर्मानुसार अनेक धार्मिक यात्रा पुण्यादायी मानण्यात आल्या आहेत. कैलास-मानसरोवर, अमरनाथ, चार धाम, नर्मदा परिक्रमा अशा यात्रा करून पुण्य पदरात पाडून घेण्याचा भाविकांचा उद्देश असतो. हिमाचल प्रदेशमधल्या श्रीखंड महादेवाच्या दर्शनासाठी जाणारी श्रीखंड महादेव यात्राही पुण्यदायी मानली जाते. जून-जुलै महिन्यात या यात्रेचं आयोजन केलं जातं. या यात्रेविषयी...
 
 
  • हिमाचल प्रदेशमधल्या द ग्रेट हिमायलन राष्ट्रीय उद्यानाजवळ श्रीखंड महादेवाचं मंदिर आहे. इथल्या पर्वत शिखरावर साक्षात महादेवाचा वास असल्याचं इथली मंडळी मानतात.
  • या मंदिरातलं शिविंलग 72 फूट उंच आहे. हे स्थान निसर्गरम्य असून हिरवाईने नटलेल्या वळणावळणाच्या रस्त्याने ही यात्रा करायची असते. या काळात इथलं वातावरण खूप आल्हाददायी असतं.
  • ही यात्रा पूर्ण करण्यासाठी तब्बल 18,570 फूट अंतर पार करावं लागतं. अमरनाथप्रमाणे ही यात्राही कठिण मानली जाते. पण भोलेबाबाच्या नावाचा जयघोष करत भाविक ही यात्रा पूर्ण करतात.
  • या काळात ऑक्सिजनची कमरता जाणवते. त्यामुळे श्वसनाचा त्रास िंकवा ह्दयविकार असलेल्यांनी यात्रेआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
  • या यात्रेला पौराणिक महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार या स्थानी भस्मासूराचा वध झाला. भस्मासूर नावाच्या राक्षसाने शंकराला प्रसन्न करून घेऊ न ज्याच्या डोक्यावर आपण हात ठेऊ , तो भस्म होईल असा वर मागून घेतला होता. यामुळे भस्मासूर खूप मातला होता. या भस्मासूराला पार्वतीशी विवाह करण्याची इच्छा झाली. शंकराच्या डोक्यावर हात ठेऊ न त्यालाच भस्म करण्याचं कारस्थान भस्मासूराच्या डोक्यात शिजू लागलं. त्याच वेळी विष्णूने मोहिनी रूप घेऊ न भस्मासूरासोबत नृत्य केलं आणि त्याला स्वत:च्याच डोक्यावर हात ठेवायला भाग पाडलं. यामुळे भस्मासूर जळून नष्ट झाला. हे स्थान श्रीखंड महादेव मंदिराच्या जवळ असल्याचं बोललं जातं.