रिक्षा चालकांसाठी केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय

    दिनांक :13-Aug-2019
नवी दिल्ली,
दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने फ्री इंटरनेटची घोषणा केल्यानंतर आता पुन्हा मोठी घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी रिक्षा फिटनेस फी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या निर्णयाने दिल्लीतील रिक्षा चालकांना चांगलाच फायदा होणार आहे.
 
तसेच या व्यतिरिक्त रिक्शाची नोंदणी फी देखील आता निम्म्याने कमी करण्यात आली आहे. याआधी रिक्षा नोंदणीसाठी 1000 रुपये मोजावे लागायचे, परंतु आता ही रक्कम केवळ 300 रुपये करण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिम कार्ड फी, जीपीएस शुल्कही माफ केले गेले आहे.

काही दिवसापूर्वीच केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये फ्री इंटरनेटची घोषणा केली होती. त्यानंतर रिक्षा चालकांना खुश करण्यचा प्रयत्न सरकार करताना दिसते आहे. मात्र आम्ही निवडणुकांच्या जाहीरनाम्यात केलेल्या घोषणांची पूर्तता करत आहोत. त्यामुळे निवडणुकांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन असं काहीही नसल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.