महापौर, उपमहापौरांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

    दिनांक :13-Aug-2019
मुंबई,
  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक घेण्यात आली.  या बैठकीत सांगली, कोल्हापूर, साताऱ्यासह इतर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 6 हजार 800 कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला  या सोबतच महापौर व उपमहापौर यांच्या निवडणुका विधानसभेची आगामी सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत तीन महिने पुढे ढकलण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

याचबरोबर, नागपूर येथील महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या सेवानिवृत्त 371 कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये तत्कालीन कालावधीत विविध पदांवरुन गैरप्रकार केलेल्यांबाबत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी देण्यात आली आहे.