अ. भा. ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुरग्रस्तांना १० हजाराची मदत

    दिनांक :13-Aug-2019
शेगांव,
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा शेगांवच्या वतीने आज कोल्हापुर सांगलीतील पुरग्रस्तांसाठी दहाहजाराची मदत पाठवण्यात आली ही मदत शेगांवचे नायब तहसीलदार भागवत यांचेकडे मुख्यमंत्री निधी करीता सुपुर्द करण्यात आली आहे.
सांगली आणी कोल्हापुरात भिषण पुरपरीस्थिती उद्बभवलेली आहे अशा प्रसंगि तेथील बंधुभगिनींना मदतीचा हात देणे आपले कर्तव्य आहे ही जवाबदारी समजून शेगांव येथील अ भा ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्त पंकज उर्फ मोनू देशपांडे यांनी आपल्या आजच्या वाढदिवसाचा पाच हजार रुपयांचा खर्च न करता ती रक्कम मुख्यमंत्री निधीसाठी देण्याचे ठरवले तसेच पंकज शितूत यांनी सुध्दा त्यात पाच हजार रुपयांची भर घालून त्या रक्कमेचा चेक अ भा ब्राह्मण महासंघाकडे दिला असे एकुण १० हजार रुपयांचा निधी अ भा ब्राह्मण महासंघाच्या पदाधीका-यांनी नायब तहसीलदार भागवत यांच्याकडे सूपुर्द केला यावेळी महासंघाचे पदाधीकारी शंकरराव जहागिरदार पवनसेठ शर्मा बालुभाऊ मिश्रा विजय मिश्रा नंदु कुळकर्णी हर्षल चासकर राजकुमार व्यास महेन्द्र व्यास शंतनुमहाराज देशपांडे विवेक घोडेराव हरीषसेठ जोशी कमल शर्मा महेन्द्र अग्रवाल यांच्यासह पदाधीकारी उपस्थीत होते अ भा ब्राह्मण महासंघाच्या वतीने सांगली येथे एक कँम्प लावला असुन पुरग्रतांची राहण्याची व चहापाणी फराळ जेवणाची व्यवस्था केल्या जात आहे. तसेच पुर उतरत असल्यामुळे मोठ्याप्रमाणावर साचलेला गाळ काढणे सफाई करण्याचे काम महासंघ रात्रंदिवस करत आहे त्यासाठी लागणारे हजारो झाडु फिनाईल मास्क हँंन्डग्लोज पुरवण्याचे काम अ भा ब्राह्मण महासंघाच्या वतीने सुरू आहे तरीही समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात मदत पाठवावी असे आवाहन  निखिल लातूरकर प्रदेश कार्याध्यक्ष यांनी केले आहे.