केंद्रीय गृहमंत्री अमित शाह श्रीनगरमध्ये १५ ऑगस्टला तिरंगा फडकवणार?

    दिनांक :13-Aug-2019
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे १५ ऑगस्टला श्रीनगर येथील लाल चौकात तिरंगा फडकवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांनी हे पाऊल उचललं तर ते आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरेल यात काहीही शंका नाही. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर आता श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याची तयारी अमित शाह यांनी सुरु केली आहे अशी माहिती समोर येते आहे.
 
 
 
गुरुवारी म्हणजेच १५ ऑगस्टच्या दिवशीच अमित शाह श्रीनगरला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर राज्याचं दोन केंद्र शासित प्रदेशात विभाजन केल्यानंतर अमित शाह यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सध्या काश्मीर खोऱ्यात आहेत. तिथे कलम ३७० हटवल्यानंतर काय परिस्थिती आहे याचा आढावाही ते घेत आहेत.