उल्हासनगरात इमारत कोसळली; १०० जण वाचले

    दिनांक :13-Aug-2019
उल्हासनगर,
कॅम्प तीनमधील 'महक अपार्टमेंट' ही पाच मजली इमारत आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास कोसळली. या इमारतीला काल अनेक ठिकाणी तडे गेले होते. तसेच अनेक ठिकाणी तडे गेले होते. त्यामुळं महापालिकेनं ही इमारत रिकामी केली होती. जवळपास १०० जणांना स्थलांतरित केले होते. इमारत वेळीच रिकामी केल्यानं मोठा अनर्थ टळला.
 
 
इमारतीला सोमवारी अनेक ठिकाणी तडे गेल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली. महापालिकेचे अधिकारीही घटनास्थळी आले होते. त्यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव इमारतीमधील ३१ फ्लॅटमधील जवळपास १०० जणांना स्थलांतरित करून ती सील केली. आज, मंगळवारी सकाळी १०.०८ वाजता ही इमारत कोसळली. अग्निशमन दल आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वेळीच इमारत रिकामी केल्याने तब्बल १०० जणांचे प्राण वाचले. या दुर्घटनेत
उल्हासनगर कॅम्प दोन भागातील लिंकरोड परिसरात असलेल्या 'महक अपार्टमेंट' या इमारतीतील १०२ फ्लॅटचे दरवाजे सोमवारी पहाटे आतून उघडत नव्हते. त्यामुळे घाबरलेल्या रहिवाशांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधत मदत मागितली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत फ्लॅटचे दरवाजे उघडून दिले. अन्य सदनिकाधारकांचेही दरवाजे उघडत नसल्याने अग्निशमन दलाने इमारतीची पाहणी केली. इमारतीचा खांब खचल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. तसेच या प्रभागातील लोकप्रतिनिधी नरेंद्र ठाकूर आणि नारायण पंजाबी यांनी या घटनेची माहिती वास्तुविशारद भूषण कटारिया यांना दिल्यानंतर त्यांनीही इमारतीची पाहणी केली. त्यांना इमारतीचा मधला खांब खचल्याचे आढळले. याबाबत महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांना कळवले. यानंतर शिंपी यांनी रहिवाशांना पंधरा मिनिटांचा वेळ देत, घरातील मौल्यवान वस्तू सोबत घेऊन इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले. अग्निशमन दलाने या इमारतीतील प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढले. महापालिकेने ही इमारत सील केली. वेळेवर इमारत रिकामी केल्याने मोठा अनर्थ टळला.