पूरग्रस्तांसाठी ६ हजार ८०० कोटींच्या निधीची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

    दिनांक :13-Aug-2019
मुंबई,
 
केंद्र सरकारने पूरग्रस्त भागांसाठी ६ हजार कोटींची मदत द्यावी अशी मागणी राज्य सरकारने केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी दिली आहे. आज मुंबईतल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दुसरा भाग असेल. कोल्हापूर, सांगली, सातारा यासाठी ४७०० कोटी तर कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी  २१०० कोटींची मदत मागितल्याचे  मुख्यमंत्र्यांनी  सांगितले. 

 
आठ दिवसांपेक्षा जास्त काळ सांगली, कोल्हापुरात पुराचे थैमान होते .  सध्या जेमतेम ही दोन शहरं आणि त्यांच्या आसपासची गावं सावरु लागली आहेत. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ५७६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच या पुरामध्ये ज्यांची घरं पडली, वाहून गेली त्यांना त्यांची घरं सरकार बांधून देणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.