मुख्याध्यापकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

    दिनांक :13-Aug-2019
कुरखेडा,
अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या एका खासगी अनुदानीत आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकावर पोस्को अंतर्गत कुरखेडा पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. बेनुदास देशमुख असे आरोपीचे नाव आहे.  तालुक्यातील अरततोंडी येथील महादेवगड आश्रमशाळेत प्राथमिक मुख्याध्यापक म्हणून ते कार्यरत असून सद्या फरार असल्याचे समजते.

 
प्राप्त माहितीनुसार आरोपी मुख्याध्यापक बेनुदास देशमुख यांनी ४ आगस्ट रोजी पिडीत विद्यार्थिनीच्या घरी जाऊन पिडिता घरी एकटीच असल्याचे पाहून तिचा विनयभंग केला पीडिताने झालेली घटना सायंकाळी आपल्या आईजवळ सांगितले आईवडील अशिक्षित असल्याने त्यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकाचे मार्गदर्शन घेऊन पीडिताच्या आईने यासंबंधीची तक्रार १२ ऑगस्ट रोजी कुरखेडा पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रारीची गंभीर दखल घेत कुरखेडा पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादवी ३५४(अ),बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम १०,१२,व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला दरम्यान गुन्हा दाखल होताच मुख्यध्यापक फरार झाल्याचे समजते घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भंवर यांच्या  मार्गदर्शनाखाली सुरू आहे.