जम्मू- काश्मीरमध्ये अफवा पसरविणारे 'हे' 8 ट्विटर अकाऊंट बंद

    दिनांक :13-Aug-2019
 
नवी दिल्ली,
जम्मू- काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर सोमवारी ईदच्या निमित्ताने ट्विटरच्या सहाय्याने विविध खोट्या अफवा पसरविल्या जात होत्या. त्यामुळे अशा अफवा पसरविणारे 8 ट्विटर अकाऊंट बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले असून आतापर्यत 4 ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे. 

 
जम्मू- काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर सोमवारी ईद शांततेत साजरी झाल्याचे दिसून आले. परंतु काही सामाजकंटकांनी ट्विटरद्वारे जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणेकडून गोळीबार करण्यात आल्याने त्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवली होती, मात्र जम्मू- काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कंसल यांनी काश्मीर खोऱ्यात बकरी ईद अगदी शांततापूर्ण वातावरणात साजरी झाली असून अशी कोणतीच घटना घडली नसल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. त्यामुळे अशी अफवा पसरविणाऱ्या 8 ट्विटर अकाऊंट बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. तसेच या अकाऊंट पैकी 4 अकाऊंट आतापर्यत बंद करण्यात आले आहे.
यामध्ये @kashmir787, @Red4Kashmir, @arsched, @mscully94, @sageelaniii, @sadaf2k19, RiazKha61370907, @RiazKha723 या ८ ट्विटर अकाऊंटचा समावेश आहे.