अकोल्यात वाहन चोरांची टोळी जेरबंद

    दिनांक :14-Aug-2019
११ दुचाकी पोलिसांच्या ताब्यात 
 
 
अकोला,
रामदासपेठ पोलिसांनी मोटार सायकल चोरणार्‍या टोळीतील तिघांना अटक केली. या चोरांकडून 11 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
 
रामदासपेठ पोलिसांनी विजय नगर आणि अन्य एका ठिकाणावरून मोटार सायकल चोरणार्‍या टोळीतील तिघांना अटक केली. या आरोपीकडून 11 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या मुद्देमालाची किंमत 4 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये सागर सुरेश क्षीरसागर, विशाल नारायण गवई आणि लखन संजय गायकवाड या तिघांचा समावेश आहे. या चोरट्यांनी अकोला शहरातील रामदास पेठ परिसरातून ५, सिव्हिल लाईन परिसरातून १ ,खदान १, रेल्वेस्थानक परिसर १ आणि अमरावती जिल्ह्यातील राजापेठ पोलिस ठाण्यात हद्दीतून २ मोटारसायकल चोरल्या होत्या. पोलिसांनी या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.