महिला सरपंचाच्या पतीस दारू विक्री करताना अटक

    दिनांक :14-Aug-2019
हिंगणघाट,
पोलीस स्टेशन अंतर्गत मडगांव येथील महिला सरपंचाच्या पतीला दारु विक्री करतांना अटक करण्यात आली.  रायकीय वलयाचा फायदा घेत आदर्श गाव योजनेला हरताळ फासल्या जात असल्याचा आरोप गावकरी करीत आहे. माडगांव येथील मंदिर परिसरात वाळूच्या ढिगार्‍यात विदेशी दारूच्या 23 पेट्यांसह सुरेश डांगरी यांना मुद्देमालासह अटक करण्यात आली. हिंगणघाट पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशनचे पी एस आय आगाशे पोलीस शिपाई निलेश तेलरांधे पौलझाडे, भालशंकर ,घोडे आदींनी कारवाई करून मुंबई दारूबंदी कायदा भादवी 65 ई 77अ नुसार गुन्हा दाखल केला आहे.