अखंड भारताच्या स्वातंत्र्याचा जल्लोष

    दिनांक :14-Aug-2019
भाजयुमोची आतषबाजी, ढोल ताशाचा निनाद 

 
 
अमरावती,
जम्मू-काश्मिरमधून कलम 370 रद्द झाल्यानंतरच्या अखंड भारताचा स्वातंत्र्योउत्सव 15 ऑगस्टच्या पुर्वसंध्येला भाजयुमोच्या पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी साजरा केला. नेहरू मैदान व राजकमल चौकात शहीदांना अभिवादन करून फटाक्यांची आतिषबाजी, ढोल-ताशाचा गजर आणि दिव्यांचा झगमगाटात हा अखंड भारताचा स्वातंत्र्योत्सव साजरा झाला.
 
आओ लगाये एक दिया सच्ची आझादी के नाम, कश्मिर के लिये जो हुये बलिदान, आईये करे उनके शहादत को सलाम, असा जयघोष करीत अखंड भारताच्या स्वातंत्र्योत्सवाला बुधवारी संध्याकाळी सुरूवात केली. जम्मू-काश्मिरमधून कलम 370 रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी हे राज्य खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य केले आणि म्हणून अखंड भारताचा स्वातंत्र्योउत्सव साजरा करण्यात आला. तब्बल एक तास हा उत्सव सुरू होता. भाजयुमोचे शेकडो कार्यकर्ते हातात तिरंगा व भारताचा नकाशा घेऊन ढोल-ताशाच्या तालावर थिरकत होते. यावेळी फटाक्यांची आतषबीजी देखील करण्यात आली. तत्पुर्वी नेहरू मैदानावर असंख्य दिव्य प्रज्वलीत करून शहीदांना नमन करण्यात आले. भारत मातेचा गगनभेदी जयघोषही यावेळी झाला. या स्वातंत्र्योउत्सवात भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्ष शिल्पा पाचघरे, प्रदेश सचिव सोपान कनेरकर, जिल्हाध्यक्ष वेदांत सुरपाटणे, जिल्हा सरचिटणीस समिर हावरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.