मागासवर्ग प्रतिनिधी आरक्षण सोडत जाहीर

    दिनांक :14-Aug-2019
विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणूक
अमरावती,
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार यावर्षी विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणूक घेण्यात येणार आहे. सर्वप्रथम विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद व महाविद्यालय विद्यार्थी परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यात अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी आणि मागासवर्ग प्रतिनिधी असे चार प्रतिनिधी निवडून येणार आहेत. मागासवर्ग प्रतिनिधी वर्गवारीत ओ.बी.सी., एस.सी., एस.टी., डी.टी-व्ही.जे.एन.टी. अशा चार वर्गवारीत आरक्षण ईश्वरचिठ्ठीद्वारे मंगळवारी निश्चित करण्यात आले.
विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेवरील मागासवर्ग प्रवर्गातील आरक्षण एस.टी. संवर्गाला निश्चित झाले. 389 महाविद्यालयांचे मागासवर्ग प्रवर्गातील आरक्षण इश्वरचिठ्ठीद्वारे निश्चित करण्यात आले असून त्याची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. याशिवाय विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवरील मागासवर्ग प्रतिनिधीचे आरक्षण सोडत काढण्यात आली, यामध्ये एस.बी.सी. संवर्गात ईश्वरचिठ्ठीद्वारे आरक्षण निश्चित करण्यात आले.

 
 
जवळपास पंचवीस वर्षानंतर खुल्या पद्धतीने विद्यार्थी परिषदेच्या निवडणूका घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निवडणूकीच्या माध्यमातून विद्यार्थांच्या नेतृत्वगुणांना निश्चितच वाव मिळणार आहे. निवडून आलेल्या विद्यार्थांना विद्यापीठाच्या विविध प्राधिकारणांवर सुद्धा प्रतिनिधीत्व मिळणार आहे. 389 महाविद्यालयांपैकी अमरावती 121, अकोला 60, बुलढाणा 90, वाशीम 36 व यवतमाळ 82 अशी जिल्हावार महाविद्यालयांची सं‘या आहे. मागासवर्ग प्रतिनिधींची सोडत मंगळवारी काढण्यात आली. त्यामध्ये ओ.बी.सी. 148, एस.सी. 101, एस.टी. 54 व डी.टी.-व्ही.जे.एन.टी. 86 याप्रमाणे महाविद्यालयांमध्ये आरक्षण असेल. संलग्नित महाविद्यालयांपैकी मागासवर्ग प्रतिनिधी कोणत्या आरक्षण वर्गवारीचा निश्चित झाला, त्याची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिलेली आहे.
डॉ.के.जी. देशमुख सभागृहात ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. दिनेश सातंगे, रासेयो प्रभारी संचालक डॉ. राजेश बुरंगे, डॉ. रवींद्र सरोदे उपस्थित होते. संचालन डॉ. रेखा मग्गीरवार यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.डी.व्ही. अतकरे, डॉ.सी.के. देशमुख, डॉ. स्मिता देशमुख, डॉ. दिलीप काळे, डॉ. प्रतिभा चिंचमलातपूरे यांचेसह विद्यापीठ व महाविद्यालयांचे शिक्षक मोठ्या सं‘येने उपस्थित होते.