'मिशन मंगल'ची पहिल्या दिवशी २८ कोटींची कमाई

    दिनांक :16-Aug-2019
मुंबई,
अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षीत 'मिशन मंगल' हा चित्रपट रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून प्रदर्शित करण्यात आला. याचाच फायदा चित्रपटाला झाल्याचं दिसून येत असून चित्रपटानं पहिल्याचं दिवशी २७-२८ कोटींची मोठ्ठी कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही चित्रपटानं अव्वल स्थान मिळवलं आहे.
प्रेक्षकांसहीत समिक्षकांकडून देखील चित्रपटाचं कौतुक करण्यात येत असून. देशभक्तीपर चित्रपट बॉलिवूडमध्ये अधूनमधून येत असले, तरी सध्या बॉलिवूडला देशप्रेमाचं भरतं आलं आहे. त्यामुळं चित्रपटाला कमाई करण्यात यश आलं आहे. boxofficeindia.com च्या रिपोर्टनुसार गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट 'गोल्ड'ने २३.६७ करोड रूपयांची कमाई केली होती तर, 'मिशन मंगल'ने पहिल्याच दीवशी २७-२८ करोड रूपयांची कमाई केली आहे.
जगन शक्ती दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयकुमार मुख्य भूमिकेतअसून, त्याच्यासोबत अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू आणि सोनाक्षी सिन्हा आहेत. भारताच्या मंगळ मोहिमेची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे.