तहसीलदारच्या घरावरही चोरट्याची नजर

    दिनांक :16-Aug-2019
हिंगणघाट,
शहरात मागील आठवड्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातल्यानंतर पोलिसांनी आरोपीची शोधाशोध करण्यात यश मिळविले.
परंतु आता भुरटया चोरांनी डोके वर काढले असून नुकत्याच सोमवार रोजी ४ किरकोळ चोरिच्या घटना शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील कृषि उत्पन्न बाजार समितिचे परिसरात स्नेहनगर परिसरात घडल्या.
हल्ली सावनेर येथे कार्यरत असलेले तहसिलदार दिपक करंडे हे हिंगणघाट येथे भाडयानी राहत असलेल्या घरीसुद्धा चोरी करण्यात आली परंतु कोणताही मुद्देमाल चोरट्यांना मिळाला नाही.  करंडे हे समुद्रपुर येथे तहसीलदार असतांना येथे राहायचे, नुकतीच त्यांची बदली सावनेर येथे झाली.
स्नेहनगर येथील तुकाराम आसकर यांचेकडे चोरट्यांनी प्रयत्न केला, तेथे त्यांना खाण्यापिण्यावर समाधान मानावे लागले. यानंतर चोरट्यांनी तराळे यांच्या घरी व जवळच्या नान्दे याच्या इस्त्री दुकानात चोरिचा प्रयत्न केला पण सुदैवाने चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही.